२८ वर्ष महाराष्ट्रात राहिलेली, मराठी माध्यमात शिकलेली आई आणि जन्माने अमेरिकन, फक्त घरातच मराठीशी संबंध येणारी १४ वर्षांची तिची लेक यांच्यामधील ’प्रेमळ’ संवाद.
आई: तुमच्या जनरेशला हे कळणं कठीण आहे.
लेक: पिढीला.
आई: ओ.के. पिढीला.
लेक: ठीक आहे.
आई: तुझा प्रॉब्लेम काय आहे? काही बोलायला गेलं की मध्येमध्ये अडवतेस. लिंक लागत नाही.
लेक: मला कुठली अडचण नाही. (प्रश्न/समस्या असे वाक्यानुरुप योग्य बदल करत) नाही. तू मला मराठी शिकवलंस पण तुला इंग्रजी शब्द वापरलेस म्हणून अडवलं की चिडतेस आणि विसरतेस.
आई: कळलं. पण खरंच इरीटेट व्हायला होतं.
लेक: वैतागायला होतं. तुमच्या पिढीचंच कळत नाही आई मला. तुम्हीच कुठली भाषा नीट बोलत नाही. किती इंग्रजी शब्द.
संभाषणाचा अंत: लेक आईचं मराठी बघून हताश. तणतण करत स्वत:च्या खोलीत प्रस्थान. आई आपला वारसा पुढच्या पिढीकडे सोपवला जाणार आहे या जाणीवेने लेकीकडून मराठीची उजळणी करायला नाईलाजाने तयार.
लेकीची तमाम मराठी इंग्रजी बोलण्यार्यांसाठी सूचना: इंग्रजीला मराठी शब्द सुचत नसेल तर वाक्य बदलून दुसर्या शब्दाचा वापर करायचा. सोप्पं आहे. जमेल तुम्हालाही.