देवरुखच्या सावित्रीबाई ही चरित्रकथा आहे इंदिराबाई उर्फ मावशी हळबे यांची. औषधोपचाराअभावी दोन मुलींचं निधन आणि पाठोपाठ वयाच्या पंचविशीत आलेलं वैधव्य अशा अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत पूज्य साने गुरुजींच्या वैचारिक सहवासाने प्रभावित होवून सामाजिक कार्यात झोकून देणार्या मावशींची जीवनगाथा थक्क करणारी आहे. शेकडो अनाथ मुलींचा आधार असणार्या मावशींनी मातृमंदिर संस्थेच्या माघ्यमातून संपूर्ण कोकणात उभारलेल्या कामाची जमनालाल बजाज फाऊंडेशनच्या पुरस्काराने विशेष नोंद घेतली गेली. मावशीचं कार्य आणि जीवनचरित्र म्हणजे हे पुस्तक देवरुखच्या सावित्रीबाई.
अभिजित हेगशेट्येंनी लिहिलेल्या या कांदबरीची ही तिसरी आवृती आहे. या पुस्तकाचं सध्या मी अभिवाचन करत आहे. कृपया मावशींची कहाणी सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी मदत करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचू द्या. सहकार्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.