Thursday, October 1, 2020

रत्नागिरी आर्ट सर्कलच्या कार्यक्रमात माझी कथा आणि मुलाखत - FB Live/Youtube

 रत्नागिरी आर्ट सर्कलच्या कश्ती शेखने वाचक - वसा या कार्यक्रमात माझी ’संकोच’ कथा वाचली. गोष्टीतल्या नायिकेला साजेशीच कश्ती आहे त्यामुळे कथेतली षोडशा आपल्यासमोर उभी राहते. या कथेच्या अभिवाचनानंतर  माझी अर्धा तास - लेखकाचा खास यामध्ये माझी मुलाखत झाली.  ती एक तास चालली.  दिप्ती कानविंदे, नंदिनी आणि कश्ती शेख या तिघींबरोबर गप्पा चांगल्याच रंगल्या. अमेरिकेत येण्यापूर्वी मी रत्न्गागिरी, कणकवली, पालघर, देवरुख या ठिकाणी राहिलेली आहे त्यामुळे गप्पांमध्ये हे विषय होतेच. हा कार्यक्रम फेसबुक Live होता आणि या सर्व गावांतून माझ्या कौतुकासाठी सारी उपस्थित होती यासारखा आनंद नाही.

मी फेसबुक आणि युट्युब दोन्ही दुवे देते. नक्की पाहा. रत्नागिरी आर्ट सर्कल वाचन - वसा कार्यक्रमात अतिशय सुंदर कार्यक्रम महिनाभर सादर करणार आहे त्यांचे चाहते व्हा. मला फेसबुकवर मैत्रीसाठी साद घातलीत तर कृपया तसं कळवा कारण कोण, कुठून आलंय तेच हल्ली कळेना झालंय :-)

Facebook :

संकोच कथा अभिवाचन

https://www.facebook.com/watch/?v=1221566698205763


माझ्या नंदिनी, दिप्ती आणि कश्तीबरोबरच्या गप्पा

https://www.facebook.com/watch/?v=353724962634707


Youttube:

संकोच कथा अभिवाचन

https://youtu.be/XDxOTnoQ3ig


माझ्या नंदिनी, दिप्ती आणि कश्तीबरोबरच्या गप्पा

https://www.youtube.com/watch?v=zwffKXKRCqQ


Saturday, August 15, 2020

माझा पहिलावहिला लघुपट!

 माझा पहिलावहिला लघुपट. कथा माझी बाकी सारं म्हणजे पटकथा, संवाद, दिग्दर्शन कार्यशाळेतल्या नुकतीच शिंगं फुटायला लागलेल्या आणि शिंगं मारुन तयार झालेल्या सर्वाचं अर्थातच राजेश देशपांडेंच्या मार्गदर्शनाने.

नववीत असताना प्रकाश बुद्धीसागर आणि रमेश चौधरींची कार्यशाळा केली होती. तेव्हा हे प्रकरण नक्की काय असतं ते समजण्याची अक्कलही नव्हती पण कार्यशाळा संपताना एक अख्खी ’सुनीला पारनामे शाळेला चालली होती’ ही एकांकीका आम्ही सादर केली. त्यानंतर इतक्या वर्षांनी मी ही दुसरी कार्यशाळा केली तेव्हा आता खरंच काही नविन शिकायचं आहे का हा संभ्रम आणि आपणच एकटे केस काळे करुन वासरांमध्ये घुसत नाही ना अशीही शंका होती पण चंद्रकात कुलकर्णी, रवी जाधव .... अशी एकापेक्षा एक नावं आणि कोरोनाआधी गाजत असलेल्या हिमालयाची सावलीचे दिग्दर्शक राजेश देशपांडे; जे या कार्यशाळेचे संयोजकही. हे पाहिल्यावर मोह काही आवरेना!

zoom केल्यावर जीव शांत झाला. बत्तिसाव्या वर्षी अमेरिकेत पुन्हा शिकायला सुरुवात केल्यावर आपणही ’तरुण’ आहोत असं वाटलं होतं तसंच पुन्हा झालं . सगळी शिंगं असलेली ही कार्यशाळा म्हणजे धम्माल अनुभव होता आणि तो धम्माल अनुभव नक्की कसा होता हेच या लघुपटात आहे. शेवटपर्यंत पाहायला विसरु नका. टाळेबंदीच्या काळातही आमच्यातली काही वासरं शिंग मोडून अमेरिकेत कशी आली आहेत आणि काय उद्योग करायला ते पाहा या लघुपटात. गंधार बाबरेचं संकलन ’कमाल’ म्हणायला लावणारं आणि निलेश देशपांडेचं पार्श्वसंगीतही मधुर!

आपापल्या देशात, गावात, आपलं आपण आणि zoom वरुन एकत्रित प्रसगांचं चित्रिकरण. वेगळाच आणि काही प्रसंगाचं चित्रिकरण करताना ’अरे असं असतं होय, वॉव’ असे उद्गगार काढायला लावणारा हा अनुभव.