माझा पहिलावहिला लघुपट. कथा माझी बाकी सारं म्हणजे पटकथा, संवाद, दिग्दर्शन कार्यशाळेतल्या नुकतीच शिंगं फुटायला लागलेल्या आणि शिंगं मारुन तयार झालेल्या सर्वाचं अर्थातच राजेश देशपांडेंच्या मार्गदर्शनाने.
नववीत असताना प्रकाश बुद्धीसागर आणि रमेश चौधरींची कार्यशाळा केली होती. तेव्हा हे प्रकरण नक्की काय असतं ते समजण्याची अक्कलही नव्हती पण कार्यशाळा संपताना एक अख्खी ’सुनीला पारनामे शाळेला चालली होती’ ही एकांकीका आम्ही सादर केली. त्यानंतर इतक्या वर्षांनी मी ही दुसरी कार्यशाळा केली तेव्हा आता खरंच काही नविन शिकायचं आहे का हा संभ्रम आणि आपणच एकटे केस काळे करुन वासरांमध्ये घुसत नाही ना अशीही शंका होती पण चंद्रकात कुलकर्णी, रवी जाधव .... अशी एकापेक्षा एक नावं आणि कोरोनाआधी गाजत असलेल्या हिमालयाची सावलीचे दिग्दर्शक राजेश देशपांडे; जे या कार्यशाळेचे संयोजकही. हे पाहिल्यावर मोह काही आवरेना!
zoom केल्यावर जीव शांत झाला. बत्तिसाव्या वर्षी अमेरिकेत पुन्हा शिकायला सुरुवात केल्यावर आपणही ’तरुण’ आहोत असं वाटलं होतं तसंच पुन्हा झालं . सगळी शिंगं असलेली ही कार्यशाळा म्हणजे धम्माल अनुभव होता आणि तो धम्माल अनुभव नक्की कसा होता हेच या लघुपटात आहे. शेवटपर्यंत पाहायला विसरु नका. टाळेबंदीच्या काळातही आमच्यातली काही वासरं शिंग मोडून अमेरिकेत कशी आली आहेत आणि काय उद्योग करायला ते पाहा या लघुपटात. गंधार बाबरेचं संकलन ’कमाल’ म्हणायला लावणारं आणि निलेश देशपांडेचं पार्श्वसंगीतही मधुर!
आपापल्या देशात, गावात, आपलं आपण आणि zoom वरुन एकत्रित प्रसगांचं चित्रिकरण. वेगळाच आणि काही प्रसंगाचं चित्रिकरण करताना ’अरे असं असतं होय, वॉव’ असे उद्गगार काढायला लावणारा हा अनुभव.
No comments:
Post a Comment
तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणार्याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.