मला ’सपोर्ट’ करायला खूप आवडतं
माझ्यासारखे आहेत बरं खूप
आमच्याशिवाय वाजत नाही सूप!
जातो झालं सतत ’सपोर्ट’ करायला
पण आम्ही बांधील नाही कशाला
शोधायचो असतो आमचा आनंद आम्हाला!
सपोर्ट करण्यासाठी जावं लागतं सगळीकडे
थकवा येऊन डोळे मिटतात थोडेथोडे
पण ’आम्ही’ तर असायलाच हवं ना जिकडे - तिकडे!
सपोर्टने मरगळ पसरली गात्रोगात्री
बाहेर गेलं की होतील मोकळी, ही खात्री
आतल्यापेक्षा बाहेर गर्दी, आम्ही जातीचे दर्दी!
आलो कधीतरी आत, नाट्यसंगीताची चालू होती तान
स्वीकारताना सार्यांची दाद, गायक वदला
शिष्टाचाराचं ठेवा की हो थोडंतरी भान!
चालू आहे तुमचं आत - बाहेर, नका देऊ असा आहेर
गाणं संपेपर्यंत धरा धीर, नंतर वळवा मोहरा बाहेर
जो खरा रसिक, त्यासाठी आता मारावी म्हणतो लकेर!
कसला हा गायक, ह्याला ’सपोर्ट’ कळत नाही
इतकी छान तान मारली आहे की
भांगड़ा करण्याशिवाय पर्याय नाही! - मोहना