Saturday, March 5, 2011

स्वप्न

रोज एकेक स्वप्न
विसावतय मनाच्या कोप‍र्‍यात
म्हटलं,
सवडीनं हाताळेन एकेक
पण तसं कधी घडलंच नाही
वाटतं,
देवून टाकावीत सारी स्वप्न
जश्शीच्या तशी दुसर्‍याला
पण नकोच,
मी हल्ली एकेक स्वप्न निळ्याशार आभाळात सोडते
जसं,
खूप आवडीने धरलेल्या फुलपाखराला
मुक्त श्वास घेण्यासाठी सोडतो
तसं.

3 comments:

  1. स्वप्न असा स्वतालाच पडावा अन् सातःच ते जगवा!!!

    ReplyDelete
  2. khoop sundar, avadali स्वप्न निळ्याशार आभाळात सोडते, phar chan.

    ReplyDelete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.