Showing posts with label लघुपट(Short Films). Show all posts
Showing posts with label लघुपट(Short Films). Show all posts

Tuesday, June 17, 2025

त्या एका (च) घरात? (with English subtitles)

 


बाळंतपण किंवा नातवंडांना सांभाळण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी भारतातून बर्‍याच आजी - आजोबांच्या खेपा अमेरिकेत होत असतात. त्यातलेच एक सनाचे आजी - आजोबा. नेहमीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुटीत सनासाठी अमेरिकेत आलेले. 

यावेळी मात्र सनाऐवजी ते वेगळ्याच विश्वात दंग होतात... 

या लघुपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, काव्य माझं आहे आणि यात मी आजीची भूमिका केली आहे. नक्की बघा.

                 ----------------

सर्वांपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला मदत करा. बघा, इतरांना पाठवा, युट्युबवर‌ अभिप्राय द्या. वाहिनीचे सभासद व्हा. (Please like, subscribe, share and comment.)

Friday, May 16, 2025

लगाव ना!

 बाबासारखंच कुठे, काय बोलायचं हे न कळणार्‍या छोट्या मुलाचा उद्योग. उद्योग कोणाचा, शिक्षा कोणाला😊.





Sunday, August 25, 2024

इच्छा


माझी निर्मिती आणि भूमिका असलेला 'इच्छा' हा लघुपट (१४ मिनिटं) Digital filmmakers या वाहिनीने प्रसिद्ध केला आहे.


माझ्या कथेला दिग्दर्शक, संकलक शिवाजी कचरे यांची जोड मिळाली आणि पुणे, रत्नागिरीच्या कसलेल्या कलाकारांनी एक हृदयस्पर्शी कलाकृती घडवली. आई-वडील आणि मुलांच्या नात्यामधील विविध पदर आणि समाज यांचं बोलकं चित्रण म्हणजे हा लघुपट.


subtitles आहेत त्यामुळे इतर भाषिकांनाही हा लघुचित्रपट नक्की पाठवा. जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला मदत करा - मोहना.


Friday, July 15, 2022

आजोबा जेव्हा नातीला...

 आजोबा जेव्हा नातीला कामालाच लावतात तेव्हा काय होतं...


कृपया आमच्या वाहिनीचे सभासदही व्हा.



Tuesday, January 18, 2022

बदल!

दरवर्षी जानेवारी महिन्यात मुलं बदलली नाहीत तर जिथून आणली तिथे सोडायची हा माझा संकल्प असतो.  कचराकुंडी, रस्ता, जत्रा  असा त्यांच्या जन्माचा उगम. सोडायचं तर नक्की कुठे त्यामुळे ती अजूनही इथेच. त्यांना नाही तर नवर्‍याला तरी बदला रे बदला हा धोशा लावावा लागतोच. ते म्हणताना इतके टॉमेटो चिरले की पुढच्यावेळी अशा भूमिका मुलांना आणि नवर्‍याला देऊन त्यांची भूमिका मी करणार आहे.  बघा तर - बदल!


Friday, December 3, 2021

गळ


जोगळेकर कुटुंब घरातल्या घरात एकत्र आलं आणि त्यांनी ’गळ’ टाकला म्हणजे ’गळ’ करण्याचा घाट घातला. खरंतर तो घाट घातला मीच पण गळ लावून त्यात सगळ्यांना ओढलं. नेहमीप्रमाणेच मी काही काम करायला सांगितलं की जसे सगळ्यांच्या चेहर्‍यावरचे भाव बदलात तसंच झालं; विशेषत: नवर्‍याचं. त्याने तोच भाव ठेवून काम केलं आहे त्यामुळे अभिनय अगदी सहज आणि भूमिकेला साजेसा झाला आहे. लेकिने काय करेन ते एकाच ’शॉट’ मध्ये असंच आधी सांगितलं होतं त्यामुळे दिग्दर्शकाला कुणालाही ’वाकवण्याची’ संधीच मिळाली नाही. तरी मी सगळ्यांना म्हणत होते मानधन घ्या म्हणजे मुकाट माझं ऐकाल पण नाही; एका पैशाचीही अपेक्षा न बाळगता तिघांनी मला ’वाकवायची’ संधी सोडली नाही. तरी मी चिकाटीने हा ५ मिनिटांचा लघुपट केलाय. बघा आणि बेधडक मुलीला, नवर्‍याला नावं ठेवा. आता नेपोटीझमवाल्यांचं दु:ख कळलं. आमच्यासारख्यांचं फाफटीझम होतं घरातल्याच लोकांना काम दिलं (करायला लावलं) की. 

गमतीचा भाग सोडला तर खरंच माझ्या लेकिने खूप मन लावून काम आणि चित्रिकरण केलं आहे आणि नवर्‍याने नेहमीप्रमाणे हं, हू, बरं, नक्की असं तो नेहमी करतो तसंच इथेही उत्तम केलं आहे. लेकाने त्याचा आवाज चार चार वेळा आठवण करुन दिल्यावर लगेच दिला. या सगळ्या घाटात आमच्या मित्रमैत्रिणींनी उत्साहाने विचारल्याक्षणी उपस्थिती लावली आहे आणि अभिजय काणेने उत्कृष्ट पार्श्वसंगीत दिलं आहे. बघा तर आमचा ’गळ’.

For my non Marathi Speaking friends: Mohana, Viren, Parnika and Rutvik have created a short film 'Lure' and it is with subtitles. Enjoy our family production.