Tuesday, September 27, 2011

एकांकिका

खूप दिवसात ब्लॉगवर यायलाच जमलं नाही.  एकांकिकेच्या गडबडीत वेळच झाला नाही. गेले चार महिने दोन एकांकिका बसवत होतो आम्ही. म्हणजे मी आणि  माझा नवरा. 'खेळ' आणि 'सांगायचं राहिलंच'
कलाकार आणि मित्रमंडळी होतीच मदतीला. पण नाट्यगृह आरक्षित करणं, तिकीटं विकणं, जाहिरात करणं,  एकांकिकेची जाहिरात करताना संकेतस्थळासाठी वर्णन, रेडिओसाठी वेगळं, माहितीपत्रकाकरता निराळं.....खूप कामं. आणि सराव, सराव, सराव....त्यात एका एकांकिकेत  भूमिका आणि दोन्हीचं दिग्दर्शन. पण छान पार पडलं सारं. २५० च्या आसपास लोक होती. प्रेक्षकांना आवडल्या दोन्ही एकांकिका. या दुव्यावर माहिती आहे.   एकांकिकाच्या क्लिप्स आहेत त्या पहा. कळवा मला कशा वाटल्या.  वाचकांपैकी अमेरिकतलं कोणी असेल तर तुमच्या इथे (मंडळात) अभिव्यक्तीच्या एकांकिका करायला मिळतील का किंवा कुणाशी त्यासाठी संपर्क साधता येईल ते कळवलंत तर आनंद होईल.
http://marathiekankika.wordpress.com/

2 comments:

  1. म्हणजे तुम्ही तितक्याच सर्जनात्मक गोष्टीत गुंतलेल्या होतात तर!

    ReplyDelete
  2. एकांकिका झलक मस्त आहेत. तुम्हाला स्वतंत्र पत्र पाठवलं आहे महाराष्ट्र मंडळात एकांकिका संदर्भात.

    ReplyDelete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.