पत्र पलंगावर टाकून तो उठला. थोडावेळ ते त्याच्या मनात घोळत राहिलं पण संध्याकाळपर्यंत पत्राची पुसटशी आठवणही त्याच्या मनात राहिली नाही. नंतर सुट्टीचे दोन दिवस कसे गेले तेही समजलं नाही. सोमवारी शाळा सुटल्यावर घामाघूम होवून शुभम उभा होता बाबाची वाट पहात. चार मैल धावून अंगातलं त्राण नाहीसं झालेलं. भरीला अचानक पडलेल्या थंडीमुळे डोकं दुखायला लागलं होतं. इतक्यात रांगेत उभी असलेली टोयोटा त्याला दिसली. त्याने हात हलवला तसं बाबाने रांगेतून थोडीशी बाहेर काढत गाडी पुढे आणली. गाडीत बसल्यावर एकदम त्याला आईने लिहिलेलं पत्र आठवलं. पुन्हा वाचायचं ठरवलं होतं पण जमलंच नव्हतं. पाण्याची बाटली तोंडाला लावत शुभमने सकाळी बसमध्ये घाईघाईत खिशात ठेवलेला तो चुरगळलेला कागद काढला.
"आई किती छान लिहिते."
"काय लिहिलंय एवढं?" बाबाची उत्सुकता चाळवली.
"पत्र!".
"कुणाला?"
"मला."
"तुला आणि पत्र?" बाबाला आश्चर्यच वाटलं. त्याला वाटलं होतं काहीतरी छानसा सुविचार वगैरे असेल लिहिलेला. एकदम पत्र म्हणजे जरा नवलच.
"हो का, त्यात काय?"
"अरे घरातल्या घरात कशाला लिहायचं ते पत्र? बोलू शकते की ती."
"हो. पण आपण तिला बोलू देत नाही असं वाटतं तिला."
बाबा हसायला लागला. शुभम शांतच होता.
"मला दे ना वाचायला. कळू दे तरी काय लिहिलंय तिने लाडक्या लेकाला."
"गाडी चालवताना कसं वाचशील. आणि ते मला लिहिलंय."
"तर काय झालं? दे की. नाहीतर तू वाचून दाखव."
"देतो आणि मला नीट समजावून सांग तिला काय म्हणायचं आहे ते. एकदा वाचलंय मी पण कळलं नाही नीट."
त्याने नाईलाजानेच ते पत्र बाबाच्या हातात दिलं. आईला हे कळलं तर पुढचं पत्र तो बाबाला वाचायला देणार नव्हता.
घरी पोचल्या पोचल्या बॅकपॅक भिरकावत शुभम त्याच्या खोलीत धावला. हायस्कुलमध्ये आल्यापासून त्याचं क्षितिज विस्तारलं होतं. आत्तापर्यंत छोट्या मोठ्या स्पर्धांमध्ये तो भाग घेत होता. पण आता जे काही करायचं ते महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने. नववी ते बारावी सगळ्या विषयात चांगले गुण तर पाहिजेतच पण वाचनालय, वृद्धाश्रम, अपंग मुलांना मदत अशा ठिकाणी कामं केली की त्याचे गुण, स्पर्धांमधून मिळवलेली बक्षिसं, आणि पुढच्या वर्गातले विषय आधीच करण्याची धडपड. महाविद्यालयं प्रवेश देताना या गोष्टी बघतात. अभ्यास एके अभ्यास करुन नाही चालत चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवायचा तर. विचार मनात थैमान घालत होते. अंगावरचे कपडे पलंगावर भिरकावत त्याने लॅपटॉपचं बटन दाबलं. जी. मेल, फेस बुक, आय-एम, सुरु केलं. शाळेच्या संकेतस्थळावर चाचणी परीक्षेचे गुण पहायचे होते, ट्रॅकमध्ये (धावण्याचा सराव) कुठल्या नंबरवर आहोत ते बघायचं होतं. तितक्यात आय-एम वर नेहाचे शब्द यायला लागले.
"हाय"
"हॅलोऽऽऽ, ब्रेकींग न्यूज.... माझ्या आईने पत्र लिहिलंय मला."
"अं...? का पण. एकाच घरात तर राहता ना? बोलत नाही का तुम्ही एकमेकांशी?"
"मी वाद घालतो, ऐकत नाही म्हणून लिहायचा मार्ग शोधलाय तिने"
" कशाबद्दल लिहिलंय?."
"तेच गं ते. तू सांगितलेलं, परागच्या ड्रग डीलींग बद्दल. आता मलाही वाटायला लागलंय सांगावं की काय त्याच्या घरी जाऊन."
"ओ. एम. जी. (ओ माय गॉड) आर यु गोईंग मॅड? तो आणि त्याचे ते ड्रग डीलर्स मारुन टाकतील तुला."
"हो, पण त्यांना कळायला तर हवं आणि माझं नाव नको त्यात गुंतलं जायला."
" पण आपण हे कशाला बोलत बसलोय आय-एम वर. तू म्हणतोस माझ्याशी बोललं की डायरी लिहिल्यासारखं वाटतं. मग सांग ना दिवसभरातल्या गोष्टी."
शुभम मग बराचवेळ त्या पत्राबद्दलच बोलत राहिला. आईने तिचं चुकलं हे कबूल केलं होतं त्या पत्रात, त्यातच तो खूष होता. नेहाही कुतूहलाने ऐकत होती.
"बरं आपल्याला पोस्टर करायचं आहे एकत्र. लक्षात आहे ना." आईच्या पत्रातून तो बाहेर आलाय असं वाटल्यावर तिने विचारलं.
"भिती वाटतेय घरात सांगायला. तू विचारलं आहेस आईला?"
"हो."
"मी विचारुन सांगतो."
"बरं, बाय."
"बाय."
शुभमला बरेच मित्र ऑनलाईन दिसत होते. पण अभ्यासाकडे वळायला हवं होतं.

क्रमश:
No comments:
Post a Comment
तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणार्याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.