गेल्यावर्षी हरिश्चद्राची फॅक्टरीचा अभिनेता नंदू माधव तसंच कवी दासू वैद्य यांनी माझ्या मराठी शाळेच्या मुलांशी गप्पा मारल्या होत्या. यावर्षीची सुरुवात सुबोध भावेंपासून!
बालगंधर्व चित्रपट पाहून मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना सुबोध भावेंनी दिलेली मनमोकळी उत्तरं, मुलांबद्दलची त्यांची उत्सुकता, त्यांनी मुलांना विचारलेले प्रश्न आणि मुलांशी केलेलं हितगुज. संपूर्ण कार्यक्रम आवर्जून पाहण्या/ऐकण्यासारखा आहे. शेवटी या चित्रपटातील साडी, दागिने याबद्दल ते काय बोलले आणि त्यावरुन त्यांनी मुलांना काय सांगितलं तेही.
सहभाग - आरोह बिद्रे, प्रथम इंगळे, पर्णिका जोगळेकर, समीर दलाल, इशानी भांगे, स्तव्य निलावर.
माझ्या वाहिनीचे सभासद व्हा (Please Subscribe)
चित्रफित पाहिली. आवडली. प्रश्न सुबोध भावेंनाच नव्हे तर पाहणाऱ्याला सुद्धा विचार करायला लावणारे होते. भावले ते. आम्हालाही ते जाणून घ्यावसं वाटलं असतं असे प्रश्न होते. आणि सुबोधजी तर कमालच. त्यांनी मोकळेपणाने उत्तरं दिली. न टाळता. बगल न देता. शेवटी ते अधोरेखित करतात तसं कलेचं जीवनातलं महत्व अनन्यसाधारण आहे. एकूणच मजा आली. धन्यवाद.
ReplyDeleteकिती सुंदर प्रतिक्रिया दिली तुम्ही. खरं तर पर्णिकाच्या प्रश्नाला ते काय उत्तर देतात याची एकाच वेळी धास्ती आणि उत्सुकता होती पण मोकळेपणाने बोलले ते. तुम्हाला शक्य असेल तर हे प्रतिक्रिया YouTube च्या प्रतिक्रियेत नोंदवाल का? अगदी समर्पक आहे म्हणून म्हणते आहे.
Delete