दरवर्षी जानेवारी महिन्यात मुलं बदलली नाहीत तर जिथून आणली तिथे सोडायची हा माझा संकल्प असतो. कचराकुंडी, रस्ता, जत्रा असा त्यांच्या जन्माचा उगम. सोडायचं तर नक्की कुठे त्यामुळे ती अजूनही इथेच. त्यांना नाही तर नवर्याला तरी बदला रे बदला हा धोशा लावावा लागतोच. ते म्हणताना इतके टॉमेटो चिरले की पुढच्यावेळी अशा भूमिका मुलांना आणि नवर्याला देऊन त्यांची भूमिका मी करणार आहे. बघा तर - बदल!