शाळेच्या मित्रमैत्रींणींची whatsapp वर चर्चा रंगली होती. शाळेत असताना कोण कसं जाड होतं आता कश्या शेटाण्या झाल्या आहेत अशा अर्थी. यात एकमेकींची वजनावरुन खिल्ली उडविणार्या मुलीच जास्त होत्या. अर्थात शाळेत अमकी तमकी कशी धष्टपुष्ट होती असं म्हणणारे मुलगेही होते. मला मात्र राहून राहून ज्यांच्या वजनावरुन ह्या गप्पा चालल्या आहेत त्यांना काय वाटत असेल असं वाटत होतं. हे आत्ता घडलेलं ताजं उदाहरण. पण आजूबाजूला सतत तेच दिसतं आणि अस्वस्थ व्हायला होतं. मध्ये एकदा रेल्वेत आमच्यासमोर एक जोडपं बसलं होतं. पती पत्नीची चेष्टामस्करी करत होता. त्याच्या मुलांना तो म्हणाला,
"तुमची आई म्हशीसारखी सुटली आहे." मी चमकून पाहिलं. पण त्या पुरुषाची मुलं आणि बायको सर्वांनाच ह्या शेर्यामध्ये विनोद जाणवला. सगळेच हास्यात बुडाले होते.
आपल्याकडे जाडीवरुन विनोद सर्रास केले जातात आणि मला ते नेहमी खटकतात. कधी कधी वाटतं असं वाटणारी मीच एकटी आहे. पण अशा विनोदामुळे
⦁ ती व्यक्ती बारीक होण्याच्या प्रयत्नात असेल तर अशा वक्तव्यांनी निराश होईल किंवा
⦁तिची/त्याची अंगकाठीच तशी असेल. बारीक असण्यापेक्षाही आरोग्यं संपन्न असणं जास्त महत्वाचं नाही का?
⦁आणि मुख्य म्हणजे तिच्या किंवा त्याच्या बारीक असण्याची तुम्हाला का चिंता? पाहून घेतील ना त्यांचं ते. अशा क्रुर विनोदातून विरंगुळा शोधणारी माणसं संवेदना शून्य वाटतात मला. तुम्हाला काय वाटतं की तुम्हीही त्याच जातीतले?

म्हैस हे संबोधन कधीही वाईटच...पण विनोदाबद्दल बोलायच तर, कोण ,कुठल्या परिस्थितीत, कुठच्या स्वरात ( Tone ) करतोय,मागचा पुढचा संवाद काय आहे ह्यावरून ठरत की टोचणारा आहे की हसवणारा आहे ....
ReplyDelete