Saturday, March 18, 2017

शाळा

शाळेचं नाव घेतलं की जीवात कसं गलबलतं
सारं काही उगाचच ओळखीचं भासतं!

एकच शाळा हाच शिक्का अनमोल
हर एक मनातला ओलावा खोल!

कुणीतरी कुणाला ओळखलं
आठवणींच्या गजर्‍यात पुन्हा ओवलं!

काही चेहरे प्रेमात पडलेले
काळाच्या ओघात दुरावलेले!

काही चेहरे प्रेम व्यक्त न केलेले
पुन्हा इथे डोकावलेले!

असतो एखादा तरी दुवा
जागवतो मनातला मेवा!

रस्त्याच्या कडेचं अरबट - चरबट खाणं
हिरव्यागार मैदानावरचं सुसाट पळणं!

मैदान,  शिक्षक, मित्र - मैत्रिणी
मनाच्या फळ्यावर सार्‍याची गर्दी!

प्रत्येकाच्या आठवणींची वेगळी पाटी!
कमावलं, गमावलंची पुसट नक्षी!

तेवत ठेवू दिवा स्नेहाचा
शाळेतल्या सवंगड्यांचा! - मोहना प्रभुदेसाई जोगळेकर

4 comments:

  1. kharch shala hi shala asate
    "Shaletya jivanachi tulnach hou shakat nahi"
    I like your Poem...
    Aaj punha tabbala 8 varshani shalechya AATAVANI JAGYA ZALYA.
    thanks...

    ReplyDelete
  2. शाळेत आपण वाढतो नव्हे शाळेत आपण घड़तो. आयुष्याला वाटा दाखवणारी प्रत्येकाची शाळा वेगळी असली तारी त्याच्या मनात घर करुन गेलेली असते ..

    ReplyDelete
    Replies
    1. मन:पूर्वक धन्यवाद दिपक!

      Delete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.