मराठी माणसाचा नादिष्टपणा काय करायला लावेल ते सांगता येत नाही. मामबोकरांच्या (माझा मराठीचा बोल)डोक्यात अंकाचं ’खूळ’ तीन वर्षापूर्वी आलं. पहिले दोन अंक ’आपले आपण’ सदरात मोडणारे होते. यावर्षी ’आंतरजालीय अंक’ काढायचं ठरलं.
अंक वाचनीय आहे. भारत आणि अमेरिकेतल्या लिहित्या हातांचं दर्जेदार साहित्य या अंकात आहे. तुम्हाला तिथली अक्षरं वेगळ्या दुनियेत घेऊन जातील याची खात्री वाटते. वाचा आणि प्रतिक्रिया नोंदवून आमचा उत्साह वाढवा. - https://www.mambodiwali.com
या अंकासाठी मदत करत असताना नकळत आठवण झाली ’अस्मिता’ त्रैमासिकाची. केरीमध्ये राहत असताना ’अस्मिता’ नावाचं त्रैमासिक आम्ही काढायचो. या उत्साहाच्या परिणीती म्हणजे, आज तिथल्या नगरवाचनायात शेकड्यांनी मराठी पुस्तक उपलब्ध आहेत.
या अंकातील माझ्या कथेत लहान मुलीचं विश्व आहे. तिच्या नजरेतून तिला दिसणारे तिचे सावत्र वडील आहेत. दोघांच्या नात्यातला भावनिक गुंता हलक्याफुलक्या स्वरुपात सोडवला आहे. हा प्रवास सुखद वळणापाशी कसा पोचतो त्याची ही कथा... वाचताय ना? वाचून तिथे प्रतिसाद नोंदवायला विसरु नका:
nice article
ReplyDelete