काही वर्षांपूर्वी लेखक मुकुंद टाकसाळे अमेरिकेत आमच्या घरी आले होते. त्यांची मुलगी इथे असते. तिच्याकडे ते येत जात असतात. त्यावेळी त्यांनी केलेल्या अभिवाचनाच्या कार्यक्रमातील ही एक कथा.
Monday, July 21, 2025
Sunday, July 13, 2025
अमेरिकेत नाटक, लेखन आणि मराठीची जोपासना
गौरी मेहंदळे शार्लटमधली लेखिका आणि गुणी कलाकार. तिने माझी आणि विरेनची मुलाखत घ्यायची ठरवली आणि दोघांची झोप उडाली. विरेनची, मुलाखत द्यायची म्हणून आणि माझी, मुलाखतीत विरेन काय बोलेल म्हणून😊.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो असं म्हटलं जातं. आम्ही यशाच्या मागे न धावता एकमेकांबरोबर धावत राहिलो त्यामुळे
एकमेकांच्या मागे उभं राहण्याचा प्रश्नच आला नाही आणि यशस्वी आहोत की नाही हा विचार करण्याचाही 😊.
नवरा - बायकोने एकत्र काम करणं सोपं नसतं तसंच एकत्र मुलाखत देणंही. तरीही ते केलं आहे. विरेनची ही पहिलीच मुलाखत आहे. नक्की बघा. youtube वर अभिप्राय द्या आणि गौरीच्या वाहिनीचे सभासदही व्हा.
Monday, July 7, 2025
साद
काही वर्षांपूर्वी पानशेतजवळच्या वृद्धाश्रमात तिथल्या वृद्धांशी खूप गप्पा झाल्या/ मारल्या. बहुतेकजणांचं वृद्धाश्रमात येण्याचं कारण नेहमीचंच होतं पण त्यामध्ये एका स्त्रीने जे म्हटलं ते माझ्या मनात नेहमीच घोटाळत राहिलं. तिचीच ही गोष्ट 'साद'. (Short film with English subtitles).
फेब्रुवारीमध्ये रत्नागिरीत हा लघुपट आम्ही केला. रत्नागिरीचा होतकरू तरुण स्वानंद देसाईने दिग्दर्शन केलं आहे. बाकी सारे कलाकार रत्नागिरीचे आहेत आणि मूळची रत्नागिरीची मी, 'ती' स्त्री आहे.
जरूर बघा, अभिप्राय नोंदवून आमचा उत्साह वाढवा, इतरांना कळवा, आवडल्याचा अंगठा उमटवा (आवडला तर) म्हणजेच Please like, comment, share and subscribe.