पुरुषावर जोडीदाराकडून होत असलेल्या अत्याचाराची नोंद फार होत नाही त्यामुळे ठोस आकडेवारी उपलब्ध नाही. तरीही साधारणपणे मानसिक छळाचं प्रमाण भारतात ५१ - ५२ टक्के (विशेषतः हरियाणा राज्यात अधिक) आहे. जागतिक स्तरावर तेच प्रमाण १२% ते ५८ % आहे.
या समस्येवर अधिक जागरूकता निर्माण होणं, पुरेशी मदत उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. हाच विषय घेऊन कवितेचं गाणं आणि गाण्यावर केलेलं चित्रीकरण. कविता वाचा आणि चित्रीकरण पाहाही.
साहावे मुकपणे
शब्द ओठी न यावे!
हे समाज शिकवे
पुरुषार्थ हा म्हणे!
सदा रडगाणे कशाचे
शांततेचे जणू वावडे!
सपासप वार शब्दांचे
कशाला बंधन जन्माचे!
विरती प्रितीचे धागे
वेढती द्वेषाचे जाळे!
तरी पुरूषाला म्हणे
पुरुषागत वागावे!
होईल हसे
व्यक्त होण्याने !
काळीज जळे
याच चिंतेने!
आज वाटे बोलावे
हे असे का साहणे?
माझे हेच सांगणे
सोसू नये मुक्याने!
No comments:
Post a Comment
तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणार्याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.