Friday, December 14, 2012

काय चाललं आहे हे...

एका तरुण मुलाची आई त्याच्या बंदुकीच्या गोळीला बळी पडते. तिथून तो ती ज्या शाळेत शिकवत असते त्या प्राथमिक शाळेत जातो. आईच्या वर्गातले चिमुकले जीव बंदुकीच्या गोळीने टिपतो. कोण विचारणार जाब या कृत्याचा? आणि कुणाला? जाब विचारायला तो मुलगाही या जगात नाही, त्याची आईही. आता आम्ही फक्त चर्चा करायच्या यव करायला हवं आणि त्यव करायला हवं....

असं काही झालं की आठवतं ते १९९९ मधील लिटलटन कोलोरॅडो येथील घटना. दोन विद्यार्थ्यांमुळे जीवाला मुकलेली माध्यमिक शाळेतील १२ मुलं. २००७ साली तरुण माथेफिरुच्या गोळ्यांना बळी पडलेली व्हर्जिनिया टेकमधील ३२ तरुण मुलं आणि अशाच घटना एकामागून एक, अनेक.  त्यानंतर त्याची कारणमीमांसा शोधली जाते, उपाय शोधले जातात, काही काही प्रत्यक्षात राबवले जातात आणि मग पुन्हा हे असं.....कधी थांबणार आणि कसं?

या जगाचा, जग न बघताच निरोप घेतलेल्या त्या चिमुरड्यांच्या आई वडिलांच्या दु:खाच्या कल्पनेने जीव कालवतो, डोळे आसवांनी चिंब होतात. त्यांना देव हे दु:ख झेलण्याचं सामर्थ्यं देवो हीच प्रार्थना!


http://www.washingtonpost.com/

12 comments:

  1. अतिशय वाईट वाटलं वाचून.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सुनिता. खरं आहे, सुन्नपणा येतो विचार करुन मनाला.

      Delete
  2. मनाला सुन्न करणारी ही घटना! कितीही चर्चा केली तरी ह्यावर उपाय नाही हे आपण जाणून आहोत आणि म्हणूनच आपली अस्वस्थता अधिक वाढते. सकाळी CNN वर एका तज्ञ स्त्रीची ह्या विषयावरील मुलाखत पाहत होतो. त्यात तिने एक महत्वाचा मुद्दा मांडला. मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तींविषयी जवळच्या नातलगांना, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरना अधिक माहिती असते. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे ही स्थिती गेल्यास सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने त्यावर कठोर उपाय करणे आवश्यक असत. परंतु त्यात व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येवू शकते. एकंदरीत हा एक संवेदनशील मुद्दा आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. आदित्य, हो, खरं आहे. एकंदरीतच आपलं बदलत चाललेलं रहाणीमान, मूल्य अशा कितीतरी गोष्टी मनात येत रहातात. १९९९ साली कोलोरॅडोची घटना झाल्यावर मी लोकसत्तेसाठी त्यावर लेख लिहला होता त्यातल्या कितीतरी गोष्टी आठवत रहातात, खेदाची गोष्ट म्हणजे त्यावेळी खटकलेल्या गोष्टीच या प्रसंगाच्यावेळेसही तशाच आहेत. या मुलाच्या आईला, एका शिक्षिकेला दोन दोन बंदुका बाळगण्याची काय गरज होती हे तीच जाणे. अनेक शंका.....पण किती छोटी मुलं या जगाचा अनुभव न घेताच निघून गेली या विचारानेच पोटात खड्डा पडतो.

      Delete
  3. मोहना, आमच्या भावना तू छान व्यक्त केल्या आहेस, थोडक्यात आणि मुद्देसुद.

    ReplyDelete
  4. अनाकलनीय आहे हे... :(

    ReplyDelete
    Replies
    1. भानस - हो नं, तर्कापलिकडच्या गोष्टी ही मुलं एका क्षणात करुन मोकळी होतात. परिणामांचा विचार करतात की करत नाही हे जो करतो तोच जाणे.

      Delete
  5. गन कल्चर वर कठोर निर्बंध हाच एक उपाय आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरं निनाद, पण तेवढंच नाही. आजकाल मुलांना व्ही.डी.ओ.गेम्स, चित्रपट या मधील हिंसा या गोष्टी रोजच्या आयुष्यातला भाग वाटतात, तसंच तीही वागायला जातात. पुन्हा बदललेली जीवनशैली, मूल्य.....खूप घटक आहेत पण अर्थातच मुलांना ही शस्त्र इतकी सहजासहजी मिळू नयेत यासाठी बंदुकावर नियत्रंण यायलाच हवं.

      Delete
  6. I asked same question to one of my best Irish origin US citizen friend Tracey. She working there as school teacher for years. Here I am copy paste her replay as it is below. I think her replay may be representative of all american teachers. Here it is...

    "People are isolated because they are not treated for mental illness...no health insurance...no universal health care...and they have no self worth...no job and no friends because they have not been taught how to act in public or how to deal with their emotions, anxiety, or whatever else is wrong...medication for bipolar disorder is more than some people make so they just don't take it...costs too much for them to be well...

    I told you the last time after the theater shooting during the batman movie that it will get worse...I still believe it will get worse than this...this will not be the last of our own violent acts against each other."

    ReplyDelete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.