Monday, May 4, 2020

शरद पोंक्षेंशी गप्पा

शरद पोंक्षेंशी गप्पा मारणं हा एक 'अनुभव' होता.
हल्ली कोणताही कार्यक्रम जास्तवेळ ऐकत/पाहत नाहीत म्हणून आम्ही ४५ मिनिटं ठरवली होती पण नंतर कितीतरीजणांनी कळवलं की फार पटकन संपली मुलाखत, यातच सारं आलं. नाही का?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वाना सकारात्मकतेची कास धरायला हवी हे ठाऊक आहे आणि त्याची जाणीव होते जेव्हा शरदनी सकारत्मकतेने कर्करोगांशी लढा दिला ते ऐकताना, मालिकांचं बदललेलं रूप, भाषा याबद्दल काय वाटतं, चुकीचं मराठी वापरलं गेलं की त्यांच्यासारख्या सुजाण कलाकारांना काय वाटतं, त्याबाबत ते काय करतात, नथुराम आणि सावरकर यावरून त्यांना तीव्र विरोध सहन करावा लागलेला आहे अशावेळेस त्यांच्या घरच्यांची काय भूमिका असते अशा माझ्या आणि मृदुलाच्या अनेक प्रश्नांना त्यांनी दिलेली उत्तरं, मारलेल्या गप्पा खरंच ऐकण्यासारख्या आहेत. सुरूवात आणि शेवट त्यांनी म्हणून दाखविलेल्या संवादानी आहे. पाहायला आणि ऐकायला हवं असं आहे सारं. नक्की पाहा, आपल्या मित्रमैत्रीणींना कळवा (Like and Share).


2 comments:

  1. खुपच सूंदर... एक माझी पण ल‍िंक शेअर करतीये हरकत नसेल तर आवडल्यास नक्की सांगा https://mysmileworldblog.blogspot.com

    ReplyDelete
  2. छान गं मोहना. त्यानिमित्ताने तू कशी दिसतेस बोलतेस हे देखील पाहायला मिळालं. आईला ही मुलाखत पाहायला आवडेल. मी पाठवते :)

    ReplyDelete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.