शारलट, नॉर्थ कॅरोलायना येथे माझ्या मराठी शाळेचं हे दुसरं वर्ष. दर रविवारी किलबिलाट असतो घरी. हसतखेळत शिक्षणाचा हा प्रयत्न आणि त्याची झलक. विनोदी प्रवेश, पालकांची परिक्षा, नाट्यप्रवेश, गाणं सर्व काही. तुमच्या अभिप्रायाचं, सुचनांचं स्वागत.
Tuesday, June 7, 2016
Saturday, May 28, 2016
तुम्ही
तुम्ही विचारलंत,
’तुमच्याकडे’ कसं असतं?
’आपल्या’ भारतात असतं तसंच
इकडे राहून ’भारत’ आमच्या मनात
तिकडे राहून ’परदेश’ तुमच्या तनामनात!
तुम्ही तिकडे इंग्रजी जोपासता
आम्ही इकडे मराठी
सांस्कृतिक कार्यक्रमांची उधळण
भारतातल्या कलाकारांना आमंत्रण
तुम्ही आम्हाला सांगता इंग्रजी सिरीयलबद्दल
आम्ही तुम्हाला मराठी मालिकांबद्दल!
तुम्हाला ’तिकडेच’ राहतो
याचा अभिमान वाटतो!
मनात आलं म्हणून
इकडे येता येत नसतं
हे सत्य दुर्लक्षित असतं!
तुमच्या दुष्टीने आम्हाला
पैशाचा, आरामाचा, सुखसोयींचा मोह!
विनाकारण सार्याचा उहापोह!
तुम्हाला,
आमच्या ’एकाकी’ झालेल्या पालकांबद्दल सहानूभुती वाटते
आम्हाला,
तिथेच असून तुमच्या सहवासाला मुकलेल्या आई - वडिलांबद्दल!
परत नाही यावंसं वाटत?
तुम्ही विचारलंत,
तुम्हाला नाही ’इकडे’ यावंसं वाटत?
पलिकडे शांतता
बाजार हा भावनांचा
फसलेल्या इच्छा आकांक्षांचा! - मोहना प्रभुदेसाई जोगळेकर
’तुमच्याकडे’ कसं असतं?
’आपल्या’ भारतात असतं तसंच
इकडे राहून ’भारत’ आमच्या मनात
तिकडे राहून ’परदेश’ तुमच्या तनामनात!
तुम्ही तिकडे इंग्रजी जोपासता
आम्ही इकडे मराठी
सांस्कृतिक कार्यक्रमांची उधळण
भारतातल्या कलाकारांना आमंत्रण
तुम्ही आम्हाला सांगता इंग्रजी सिरीयलबद्दल
आम्ही तुम्हाला मराठी मालिकांबद्दल!
तुम्हाला ’तिकडेच’ राहतो
याचा अभिमान वाटतो!
मनात आलं म्हणून
इकडे येता येत नसतं
हे सत्य दुर्लक्षित असतं!
तुमच्या दुष्टीने आम्हाला
पैशाचा, आरामाचा, सुखसोयींचा मोह!
विनाकारण सार्याचा उहापोह!
तुम्हाला,
आमच्या ’एकाकी’ झालेल्या पालकांबद्दल सहानूभुती वाटते
आम्हाला,
तिथेच असून तुमच्या सहवासाला मुकलेल्या आई - वडिलांबद्दल!
परत नाही यावंसं वाटत?
तुम्ही विचारलंत,
तुम्हाला नाही ’इकडे’ यावंसं वाटत?
पलिकडे शांतता
बाजार हा भावनांचा
फसलेल्या इच्छा आकांक्षांचा! - मोहना प्रभुदेसाई जोगळेकर
Subscribe to:
Posts (Atom)