Tuesday, January 22, 2013

मुलांना घरातील कामाचे पैसे...?

सगळ्या मैत्रींणी जमलो होतो. मुलांवरुन बोलताना एकजण म्हणाली,
"मी मुलांना प्रत्येक कामाचे पैसे देते. थोड्या पैशात किती कामं होतात."
"म्हणजे किती आणि कोणती कामं?" माझं कुतुहुल जागृत झालं.
"डिशवॉशरमधली भांडी लावली की ५० सेंट, केर नेऊन टाकला की २५ सेंट, स्वत:ची खोली आवरली की ७५सेंट अशी छोटी छोटी किती कामं असतात  घरात."
पहिला विचार मनात तरळला तो सुट्टे पैसे खूप ठेवायला लागत असतील मग :-) हा. नंतर हेवा वाटला तो स्वत:ची खोली आवरल्याबद्दल पैसे मिळतात  पठ्ठ्यांना याचा आणि  शेवटी प्रश्न पडला की त्या पैशाचं तिसरी चौथीतली ही मुलं करणार काय? एकदा का पैसे हातात आले की त्यांना काय पाहिजे ते घेणासाठी ती हट्ट करणारंच. त्यावर ती म्हणाली.
"हो ना, दुकानात गेलो की  गोळ्या, नाहीतर बबलगम घेतात मुलं त्या पैशातून."
"कष्ट करुन मिळवलेल्या पैशांनी हे घ्यायचं म्हणजे तू चुकीची सवय लावतेयस असं नाही वाटत?"
"नाही. गोळ्या, बबलगम रोज खाणं बरोबर नाही हे तर माहितच आहे त्यांना. हळूहळू पैसे अशा गोष्टींवर खर्च करु नयेत हे ही कळेल."
"मग ती पण तुला पैसे देतात?"
"कसले?"
"तू जेवण करतेस रोज त्याच्यांसाठी, शाळेसाठी डबा देतेस, गाडीने इकडे तिकडे नेतेस.... खूप मोठी यादी होईल."

 मैत्रीणीचं म्हणणं आपली कामं होत असतील तर या गोष्टीचा बाऊ करण्यात अर्थ नाही. पैसे देऊन आपण त्यांना स्वावलंबन शिकवतो, ते कसे वापरायला हवेत याचं शिक्षण देतो.

माझं म्हणणं, ही जी कामं आहेत ती मुलांनी घर त्याचंही आहे या भावनेतूनच, स्वत:ची कामं स्वत:च करायला हवीत या जाणीवेतून किंवा आई, बाबांना मदत म्हणून करायला हवीत, पैसे मिळतात म्हणून नाही. आणि ती भावना पालक म्हणून आपणच त्यांच्या मनात रुजवली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं?

15 comments:

  1. ” तू हे केलेस तर मी हे देईन ’ हे समीकरणच माझ्या मते बरोबर नाही. मुलांना जे हवे ते मिळावे यासाठी त्यांनी ते त्यांच्या वागण्यातून, अभ्यासाच्या ग्रेड्समधून, घरातल्या सक्रिय सहभागातून प्रयत्न करायला हवा. पण याचा अर्थ फक्त फायद्यासाठी ते करता नये. शाब्दिक शाबासकी मात्र जरुर द्यायलाच हवी त्या प्रत्येक वेळी.

    पालकांनी सांगितलेली घरातली कामे करण्यातून त्यांना योग्य ते वळण व सवयी आपोआपच कश्या लागतात व त्याचे फायदे समजावून दिले पाहीजेत. मुलांना थोडे पैसे जरूर द्यावेत पण ते कामांशी संलग्न न करता पॉकेटमनी म्हणून देऊन ते कसे खर्च करावे याविषयी वेळोवेळी चर्चा करावी. मात्र सतत मते लादू नयेत.

    ReplyDelete
    Replies
    1. भानस,
      अगदी. मला वाटतं इथे वर्गातल्या मुलांना कामाचा मोबदला मिळतो हे मुलांनी ऐकलेलं असतं. सहाजिकच ती आपल्या आई वडिलांकडूनही तीच अपेक्षा करतात आणि काही पालक त्याला बळी पडतात. माझी मुलगी ८ वर्षाची आहे. ती या विषयावर आम्ही घरात बोलत होतो तेव्हा म्हणाली, "मेरी आज्जी (शेजारी) एमा, मॉर्गनला (त्यांच्या नाती) तर पैसे देते कामाचे."

      Delete
  2. I agree with you. The candy and bubblegum should also to be earned by them (Children); by good behavior and performance in the studies / sports etc. For such things they should not ask parents. They should make parents offer them the things that they like / desire

    ReplyDelete
  3. I don't agree. If candy and bubblegum can be used as a reward, why not money? It teaches. Them how hard it is to earn money. I even take it a step further, I ask my son to keep accounts and double the amount that he did not spend on his birthday that he can then use to buy his own gift. Teaches accounting and saving. I triple the amount on his birthday if he gets all 'A's! Teaches how not to use chores as an excuse! Traditional Indian parenting way rarely teach them these skills. If a little money is going to teach them these important life skills, I would rather keep the 'change' around than lecturing them on hard work and saving. + why pay someone else when you can keep the money in the family?

    ReplyDelete
    Replies
    1. स्नेहल, तुझे मार्ग छान आहेत पण मुलं मोठी झाली निदान सातवी आठवीत गेली की ते योग्यं आहेत असं वाटतं.

      Delete

  4. >>>>> पालकांनी सांगितलेली घरातली कामे करण्यातून त्यांना योग्य ते वळण व सवयी आपोआपच कश्या लागतात व त्याचे फायदे समजावून दिले पाहीजेत. मुलांना थोडे पैसे जरूर द्यावेत पण ते कामांशी संलग्न न करता पॉकेटमनी म्हणून देऊन ते कसे खर्च करावे याविषयी वेळोवेळी चर्चा करावी.

    ++++++++

    कितीही व्यावहारिक विचार केला तरी घरकामासाठी मुलांना पैसे देणं नाहीच पटत. नाही म्हणजे व्यवहार शिकवला जावा. त्यातल्या खाचा-खळगे जरूर जाणवून द्यावेत पण म्हणून घराबद्दल जोडलं जाणं ते हि रिवार्डसच्या बदल्यात हे नाहीच पटण्यासारखं. उद्या मग मुलांना प्रत्येक गोष्ट काहीतरी मोबदला असेल तरच करेन हि जर सवय लागली तर कोणाला चुकीचं ठरवणार? घर जर आपलं आहे तर त्यासाठीच्या जबाबदाऱ्या, कामांची वाटणी हि आपलेपणातूनच व्हायला हवी. अन्यथा घर आणि चार्जेबल सर्विस प्रोव्हायडिंग
    यात फरक तो काय राहणार?

    ReplyDelete
    Replies
    1. श्रद्धा,
      पटले विचार. माझी जी ही मैत्रीण आहे तिच्या भूमिकेचा मी विचार केला तर असं वाटतं की परदेशात नोकरी, घर (धुणी, भांडी, केरकचर्‍यासकट) दोन्ही सांभाळायचं आणि नवरा, मुलाची काही मदत नसेल तर अशा मार्गांचा अवलंब करावा लागत असावा, जरी तो चुकीचा आहे हे कळत असलं तरी आणि मग स्वसमर्थनासाठी आणि स्वत:चीच समजूत घालण्यासाठी आपोआप अशी मतं तयार होत असावीत.

      Delete
  5. प्रत्येक कामासाठी मोबदला मिळू लागला तर स्वयंशिस्त कशी लागणार? शिवाय काही गोष्टी आपण फक्त दुसऱ्यांसाठी कशाचीही अपेक्षा न ठेवता करायच्या असतात हा विचार तरी कसा रुजणार? लहानपणापासून अशा प्रकारे पैसा मिळाला आणि पैशांचा दुरुपयोग करू नये इतकं समजलं तरी बऱ्याच गोष्टी समजायच्या राहून जातील असं वाटतं मला... आयुष्य म्हणजे फक्त पैसे कमावणं नाहीये....

    ReplyDelete
    Replies
    1. इंद्रधनू - खरं आहे अगदी, पण आयुष्य म्हणजे पैसा कमवणं, पैशाने सारं काही मिळतं.......असं होत चाललं आहे आणि अशा विचारांची पिढी, पुढची पिढी पण स्वत:सारखीच घडवणार आहे नकळत असं मला माझ्या मैत्रीणीवरुन वाटतं.

      Delete
  6. प्रत्येक शिकवणीला दोन बाजू असतात तशा इथे ही आहेत. काही पालक पोरांना म्हणतात झाडावर चढू नकोस, पडशील.. विजेशी खेळू नकोस, धक्का बसेल इ. इ. त्या मागे पोराची काळजी असते पण पोरात आत्मविश्वासाची कमी निर्माण होण्याची भीति पण असते.

    ReplyDelete
    Replies
    1. हो हा मुद्दा बरोबर आहेच. पण तरीही इतक्या लहान वयात मुलं पैशाना अवाजवी महत्त्व द्यायला लागणार नाहीत का असे घरातल्या प्रत्येक कामाचे पैसे मिळायला लागल्यावर?

      Delete
  7. ''कर्तव्य'' आणि ''उपजीविका''
    यांच्यात गल्लत निर्माण होणे म्हणजे
    आपले ''संस्कार'' चुकीचे असल्याचे
    ''प्रमाणपत्र'' प्राप्त झाल्यासारखे आहे.

    ReplyDelete
  8. A friend’s father used to ‘pay’ his wife (my friend’s mother) for taking care of the house. This was in addition to the monthly expenses of the household. She was a homemaker and this was her source of income. Now think about this. There will be arguments that one doesn’t charge for taking care of own home. It is out of care, love etc. etc. A husband should provide for all your needs. Even if that was true, would she not have to ‘ask’ him for money whenever she needed it? Instead, what is wrong if she got her own money regularly? Circumstances, family background, responsibilities may have deterred her from getting a job outside. Instead she chose to stay home and her husband recognized her efforts by paying her. You may or may not call it salary. But it is not actually different. What do you all think?

    ReplyDelete
  9. Nice post Mohana. I am also of the similar opinion, that rewards should be ideally through inner self-discipline.

    ReplyDelete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.