Thursday, December 11, 2014

प्रश्न

एकदा एका आईला वाटलं
आपण जे अनुभवलं नाही ते 
मुलांना मिळावं
मोकळेपणाने त्यांनी आयुष्य उपभोगावं!

मुलाचा चेहरा उजळला
देहभर ट्यॅट्यु ची नक्षी तो ल्याला
दारुचे ग्लास  रिचवत राहिला
नाईट लाइफच्या धुंदी चा कैफ
शरीरात मुरला 
स्वातंत्र्याचा स्वैराचार हवेत उधळला!

एके दिवशी मुलगा घेऊन आला एका मुलीला
म्हणाला,
कळत नाही लिव्ह इन रिलेशनशिप की लग्न
पण ठरवायला हवं हिच्या गर्भातल्या जीवाचं भवितव्य
माता वदली,
तुला जे वाटेल तेच योग्यं
मी काही बोलणं म्हणजे माझ्याच नियमाचा भंग!

बहिणीने भावाचा कित्ता गिरवला
बाळाच्या आगमनाचा सुगावा लागला
माता वदली,
चल, तुझ्या बॉयफ्रेंडच्या घरी जाऊ
बॉयफ्रेंड आला दारात, बाजूला त्याची आई!
तुझ्या घरच्यासारखं वातावरण आमच्याकडे नाही
लग्नाच्या आधी पोरंबाळं आम्ही होऊ देत नाही.
मुलगी भडकली, आईला म्हणाली,
कुमारी माता होऊ की गर्भपात करु?
माता थबकली, चिंतेत बुडाली
नियमाचा भंग करु  की तुला वाटेल तेच योग्यं म्हणू...?

4 comments:

  1. एक गंभीर प्रश्न तुमच्या लेखणीने पकडलाय्. विचारांच्या वाटा बंद करणारा प्रश्न! कदाचित उत्तराचीही वाट बंद करणारा प्रश्न, मोहना!

    ReplyDelete
  2. This is the result of excexx freedom given by parents to their children.

    ReplyDelete
  3. तारतम्य आणि सुवर्णमध्य हे अनेक गोष्टींचे उत्तर असते पण तेच जे विसरतात त्यांचे हे होणे ओघनेच .....

    ReplyDelete
  4. खुपच गोंधळ होतो माणसाचा केव्हा केव्हा !

    ReplyDelete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.