'कथाश्री' च्या दिवाळी अंकात माझी कथा. या कथेशी माझं घट्ट नातं आहे. ही कथा माझ्या आईवर आहे. तिचं लहानपण, तो काळ आणि काही घटनांचा खोलवर झालेला परिणाम. परिस्थिती बदलत जाते तशी माणसंही. त्यातूनच आपलं आपण स्वत:ला शोधायचं, जपायचं, समाधान मानायचं. तीच ही कथा - ’समाधान’. खाली काही भाग तुमच्यासाठी. पण अंक मिळवून नक्की वाचा. मला आणि अर्थातच माझ्या आईला खूप आनंद होईल.
"मी तयार आहे. चल ना." ठेवणीतला फ्रॉक घालून कमू गीताईसमोर आली आणि तशीच थबकली. काळ्याभोर केसांवर अबोलीचा गजरा माळलेली गीताई आरशात स्वत:ला निरखीत होती. आरशातलं तिचं ते प्रतिबिंब कमूला इतकं आवडलं की गीताईला मागून मिठीच मारावी असं वाटून गेलं. पण ती गीताईला पाहत खिळल्यासारखी उभी राहिली.
पाहणार आहोत ठाऊक आहे का?"
"मीनाकुमारीचा परिणीता." कमूने नुसतीच मान डोलावली. तिला कोणता पिक्चर याच्याशी काहीही देणघेणं नव्हतं. पिक्चर पाहून आलं की तिचा दुसरा दिवस खूप छान जाई. घरातली सगळी मुलं तिला घेरुन टाकत. सगळ्यांना गोष्ट ऐकायची असे. त्यातली गाणी तर कमूची लगेचच पाठ झालेली असत. ती गायचीदेखील सुरेल. गोष्ट, गाणं यात कमूचा दिवस खूप छान जायचा. गीताई बरोबर दर आठवड्याला पिक्चरला जायची कमू आतुरतेने वाट पाहायची.
"बांध ना वेण्या तुझ्या रिबीनीने. का मी बांधून देऊ?""नको." कमू पळालीच तिथून. जिन्याच्या पायर्या धाडधाड चढत कमू खोलीत गेली. काळोख्या खोलीची खिडकी तिने गडबडीने उघडली आणि कोपर्यात ठेवलेल्या पत्र्याच्या ट्रंकमधला छोटासा आरसा आणि फणी बाहेर काढली. केळ्याच्या दोराने बांधलेल्या वेण्या तिने घाईघाईने सोडल्या. बराचवेळ ती त्या रिबीनी कुरवाळत राहिली. पुन्हा पुन्हा केस विंचरुन तिने वेणी घातली. लाल रिबीनीने बांधलेल्या वेण्यांकडे डोळे भरुन पाहत राहिली. या दोन रिबीनी तिच्या हक्काच्या होत्या. या पूर्वी तिने एकदाच तिच्या केसांना रिबीन बांधली होती. ती सुद्धा चोरुन. घरात सगळ्यांकडे रिबीनी होत्या. त्यातलीच कुणाचीतरी तिने हळूच आपल्या केसांना बांधून पाहिली होती. आज प्रभाने आणलेल्या रिबीनी मात्र तिच्या होत्या. स्वत:च्या.
"आत्या, अगं पाहतेस काय अशी. मी पास झाले. पाऽऽस झाले. आता प्रभा मला पोस्टात नोकरी लावून देईल. द्यायलाच हवी तिने. देईल ना गं?"
"देईल हो. अगदी नक्की. हे बघ आधी साखर ठेव देवाजवळ. चल मीच ठेवते." सुधाआत्याने कमूचा हात धरुन स्वयंपाकघरात नेलं. फडताळातला साखरेचा डबा काढून वाटीत साखर घेतली आणि त्या तिला माजघरात घेऊन गेल्या. देवाजवळ साखर ठेऊन दोघी हात जोडून उभ्या राहिल्या.
"आलास. वाट पाहून पाहून डोळा लागला कमूचा." पलंगावर झोपलेल्या कमूच्या डोक्यावर हात फिरवीत आबा बसले. सुधाने लगबगीने खोबर्याच्या वड्या पुढे केल्या.
"नको, खाऊनच आलो." आबा नुसतेच कमूच्या डोक्यावर हात फिरवीत बसून राहिले.
"थोडं बोलायचं होतं तुझ्याशी."
"बोल." सुधा काय बोलणार ह्याची कल्पना आलीच आबांना. त्यांच्या स्वरातला निरुत्साह जाणवूनही सुधाने बोलायचं ठरवलं.

No comments:
Post a Comment
तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणार्याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.