"उद्या आम्ही इथून परत निघणार. आय जस्ट कॅन्ट वेट टू टॉक टू यु. ’सी यु', असं म्हणता येत नाही कारण तसं आपण फारसं भेटतच नाही. पण आता मी आल्या आल्या कार्यानुभवाच्या निमित्ताने भेटता येईल." रात्री गच्चीत झोपल्या झोपल्या शुभमने साता समुद्रापलीकडे असलेल्या नेहाला टेक्स्टिंग केलं. भारताबद्दल त्याला तिच्याशी खूप बोलायचं होतं. या खेपेला शुभमने सिंहगड पाहिला. अपेक्षाभंगच झाला. पैसा आणि इच्छेचा अभाव हे एकच कारण?. सगळे नुसतं म्हणतात भारतात हे नाही, ते नाही पण प्रत्यक्षात बदलासाठी कुणी काही करत नाहीत. भारतातल्या अनेक गोष्टीबद्दल मनात विचारांचा घोळ सुरू होता. नेहाशी बोललं की दिशा मिळेल?
शुभम परत आल्यावर मूलभूत प्रश्नालाच नेहाने हात घातला.
"आवडतं तुला भारतात जायला?"
"ठाऊक नाही. कदाचित कॉलेज झाल्यावर नोकरीसाठी म्हणून आवडेलही काही दिवस तिथे जाऊन राहायला. पण आपण राहतो ते गाव म्हणजेच माझं जग वाटतं मला. इथून मी नाही जाणार कुठे. तुला आवडतं भारतात जायला?" शुभमने तिलाच उलट विचारलं.
"अं? नाही रे. वाट्टेल ते प्रश्न विचारतात कुणीही. पहिला प्रश्न, बॉयफ्रेंड आहे का तुला? चौथी पाचवीत होते तेव्हाच हे विचारलेलं कुणीतरी. जसं काही जन्म झाल्या झाल्या अमेरिकेत प्रत्येकाला बॉयफ्रेड असतो, आणि गल्लो गल्ली लोकं चुंबनच घेत असतात असं वाटतं त्यांना. सगळ्या नातेवाईकांना भेटायला जायचं प्रकरण असतच. मनासारखं कुठे वावरता येतं तिकडे?. अंग पूर्ण झाकलं जायला हवं, तोकडे कपडे नकोत, मेकअप नाही करायचा..... काय तर म्हणे चांगल्या नजरेने पाहत नाहीत रस्त्यावर. आणि खरंच किती टक लावून बघतात. दे रिअली मेक मी नर्व्हस."
"याबद्दल खूप ऐकलंय आईकडून. मुलींना पाहून जीभ पण फिरवतात ओठावरून. आई म्हणते बाकी काही नाही तरी या गोष्टींपासून सुटका मिळवायची तर यावं अमेरिकेला. इकडे घालतात तसे कपडे, फॅशन भारतात करतात पण अमेरिकेत असे कपडे घातल्यावर कुणाच्या नजरा वारंवार वळत नाहीत, कुणी जीभ चाटत नाही हे विसरतात भारतातली लोकं. मी आता खरं सांगायचं तर आईच्या पत्राची वाट पाहतोय. तुला सांगितलं ते आईशी गप्पा मारताना तिलाही सांगितलंय. मला नक्की ठाऊक आहे की ती यासंदर्भात लिहेलच."
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
शुभंब्या,
तुझ्याकडून भारताबद्दल नकारार्थी ऐकलं की त्रास होतो. त्यातून तुझं राहतं गाव म्हणजेच तुला तुझा जग वाटतं हे ऐकलं की तर फारच अस्वस्थता येते. पण ते मान्यं करणं भाग आहेच. या देशातच तू वाढलेला, पालक भारतीय आणि दर दोन वर्षांनी महिनाभर भारतात घालवलेले दिवस एवढ्यावर आमचा देश तुला तुझाही वाटावा असं वाटण्याचा अट्टाहास आम्ही तरी का करावा? तरीही तुझी निरीक्षणशक्ती आणि बोलण्यातून सकारात्मक गोष्टी ऐकल्या की बरं वाटतं. तुला भारतातल्या मुलांसाठी काहीतरी करावंसं वाटतंय ही फारच चांगली गोष्ट आहे. खूप मुलांच्या बाबतीत असं झालं आहे. त्यांना कधी ना कधी तरी आपली मुळं शोधावीशी वाटतात. इथल्या मुलांप्रमाणे, जग फिरायचं या संकल्पनेतून आपल्या मायभूमीचं अंतरंग पाहायचं भान येतं. ही मुलं कोणत्या ना कोणत्या संस्थेतून भारतातल्या खेड्यापाड्यातलं जीवन पाहायला म्हणून जातात आणि मग जातच राहतात. तिथलं काम आवडतं म्हणून, शांत, तणावविरहित जीवनाचा अनुभव घ्यावासा वाटतो म्हणून आणि शहरीजीवनापलीकडच्या आपुलकीचं, माणुसकीचं सहजदर्शन सुखावतं म्हणून. तुझ्या सुदैवाने कितीतरी गट, संस्था तुला मार्ग दाखवायला आहेत. आणि मुंबई, पुणं म्हणजे महाराष्ट्र नव्हे हे ही यातून तुझ्या लक्षात येईल, आणि माझ्या दृष्टीने एवढं जरी झालं तरी खूपच. चला आता पुन्हा आपलं रहाटगाडगं सुरू. उद्या पहिल्यांदाच बसचा प्रवास करणार आहेस नं? कार्यानुभवाचा अनुभव हॉस्पिटलमध्ये येईल, तसाच बसच्या प्रवासाचाही अनुभव वेगळाच वाटेल. संध्याकाळी सांगशीलच कसं वाटलं बसने जाणं ते.
तुझी आई
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
बसचा प्रवास, एकट्याने. सकाळी सहा वाजता धडधडत्या मनाने शुभम थांब्यावर उभा होता. एकटाच. कुणीच नव्हतं तिथे. बापरे, बसने जातच नाही की काय कुणी. बाबाची परत फिरलेली गाडी थांबवावी असं त्याला वाटून गेलं. तेवढ्यात हिरव्या रंगाची बस फुसफुसा आवाज करत थांबली.
ड्रायव्हरने केलेल्या गुड मॉर्निंगला त्यानेही तोंडातल्या तोंडात पुटपुटत प्रतिसाद दिला आणि झुलपं उडवीत तो बसला. बसला म्हणजे काय चक्क उडालाच. इंटरनेट! बसमध्ये इंटरनेटची सोय. वॉव, आता अर्ध्यातासाचा प्रवास क्षणभरात संपेल. एकदा बस बदलून परत अर्धा तास. त्यातही असेलच म्हणा इंटरनेट. पण त्याची ही नशा फार वेळ टिकली नाही. बाजूच्या माणसाने त्याला काहीतरी विचारलं आणि मग गप्पाच सुरू झाल्या. गाडीत म्हटलं तर माणसं पाच सहाच होती. त्यात मध्ये एक 'देसी' मुलगाही चढला. सायकल घेऊन थांबला होता तो. सायकल लावली त्याने बसच्या मागे. नेहमी एकच बस पकडत असावेत सर्वजण. प्रत्येकजण एकमेकाला ओळखत होता. त्यात आज शुभमची भर. त्याच्याशी ओळख करून घ्यायला सर्वांनाच उत्सुकता होती. शुभमलाही प्रचंड कुतूहल होतं. इतकी वर्ष आई-बाबाच सोडायचे कुठेही. त्याचा असा हा पहिला प्रवास. काय करू आणि काय नको असं झालं होतं शुभमला.
हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मात्र त्याचा उत्साह निवळला.
"कुठून या फंदात पडलो असं झालंय. तुला आवडतंय हे व्हॉलेंटियरिंग?" नेहा त्याला कॅफेत भेटली तेव्हा तो चिडलेलाच होता.
"काय झालं?"
"शस्त्रक्रिया बघायला मिळेल असं वाटलं होतं. तेवढं सोडून बाकी सर्व करतोय. वैताग नुसता !"
"अरे पहिलाच आठवडा आहे आपला. मिळेल बघायला एखादीतरी शस्त्रक्रिया. आणि आपला रुबाब बघ ना. स्क्रब, हॉस्पिटलचा पोशाख, आयकार्ड... डॉक्टर झाल्यासारखंच वाटत नाही का तुला?"
"हं" त्याने नुसताच हुंकार दिला, तिचं म्हणणं पटल्यासारखा. दोन महिन्याच्या सुट्टीतला हा कार्यानुभव. केवढी धडपड केली होती शुभमने त्यासाठी. पाचशे मुलांतून दोनशे मुलं निवडणार. त्यासाठी लिहिलेला निबंध, मुलाखत, हा अनुभव निश्चितच कॉलेज प्रवेशासाठी उपयोगी पडणार होता. आज तो वैतागला तरी सगळाच काही आनंद नव्हता. डॉक्टर्स थोडेसे फटकूनच वागतात असं वाटलं तरी टीनाने, तिथल्या रिसेप्शनिस्टने, त्याच्यासाठी मुद्दाम राखून ठेवलेला केक त्याला आठवला. तिने खाऊन टाकलेलं त्याचं चॉकलेट. त्याला आत्ताही हसायला आलं. टीना म्हणाली होती. तुझीच चूक ती, का ठेवलंस ते चॉकलेट उघड्यावर. मला खूप आवडतं, म्हणून मी खाऊन पण टाकलं. डॉक्टर मंडळीपेक्षा ही लोकं जवळची वाटली. तो थोडासा शांत झाला. नेहालाही इथेच काम करायला मिळालं होतं हे सुखदायक होतच. तिची भेट फक्त सगळे मित्र मैत्रिणी एकत्र जेवायला हॉस्पिटलच्या कॅफेत भेटत होते तेव्हाच. पण तेही त्याच्या दृष्टीने खूप होतं. तो परत खुलल्यासारखा झाला.
"ऑऽसम, बाय द वे मी बसने येतो इकडे."
"आवडतं?"
"मग? खूप स्वतंत्र झाल्यासारखं वाटलं. नाहीतर एवढे मोठे झालो तरी आई-बाबावर अवलंबून राहावं लागतं. बस मस्त आहे. एकदा बदलायला लागते. तिथे जरा भिती वाटते. फारशी वस्तीच नाही त्या भागात. पण बसमध्ये चक्क इंटरनेटची सोय आहे आणि सायकल लावायला पुढे स्टँडपण. रिअली कूल."
"माणसं होती का? आय मीन गर्दी." सर्वांनाच त्याच्या बस प्रवासाचं कुतूहल होतं.
"अर्धी बस भरलेली. त्यात माझा व्हॉलेंटियर चा शर्ट बघून ड्रायव्हर विचारत होता काय करावं लागतं तिथे काम करायचं तर? त्याला सोळा वर्षाची मुलगी आहे. मी माहिती तर सांगितलीच पण एक जास्त अर्जही होता माझ्याकडे तोही दिला.
"मग ड्रायव्हर खुष का एकदम?"
"यस्. आणि एक सीक्रेट." बाकीचे मित्र तिथे नाहीत असं बघून पटकन त्याने नेहाला सांगितलं.
"बोलू नकोस कुणाला. माझं आणि ड्रायव्हरचं संभाषण ऐकत होता एक माणूस. ते सिस्को कंपनीचे डायरेक्टर आहेत बहुधा. त्यांनी सांगितलं की त्यांच्या कंपनीत पण असं कार्यानुभवाचं काम करता येतं. मी त्याचं कार्ड घेतलंय. पुढच्या वर्षी करता येईल. बाकी कुणाला सांगणारच नाहीये मी. तू येऊ शकतेस अर्थात."
"नक्कीच, माझं तेच तर स्वप्न आहे. जितक्या ठिकाणी एकत्र राहता येईल त्या गोष्टी करायच्या. आपण एकाच कॉलेजात शिकत असू. संध्याकाळी तिथल्या हिरवळीवर गप्पा मारु, एकत्र अभ्यास करू. खरं तर माझ्या शाळेत मैत्रिणी चिडवतात मला की कसली स्वप्न पाहतेस. हायस्कूल संपलं की नवीन मित्र मिळेल तुला. पण मला तुझं आणि माझं नातं टिकवायचं आहे.
"मला पण. दोघांनीही यशस्वी व्हायचं. स्पर्धांमध्ये एकत्र भाग घ्यायचा." आजूबाजूचे कॅफेत बसलेले डॉक्टर्स, नर्स, इतर लोकं उठायला लागले तसे सगळेच जण भानावर आले. निघता निघता तो म्हणाला,
"मी ठरवलंय. झालोच डॉक्टर तर असं नाही वागायचं हाताखालच्या लोकांशी. मुख्य म्हणजे हसतमुख राहायचं, टिनासारखं. इतर लोकं कामं सांगतात तेही उपकार केल्यासारखं, त्यामुळे काम झाल्यावर कौतुक बाजूलाच राहिलं." सगळ्यांनी माना डोलवल्या. आता आपापल्या विभागात जाऊन काम करायला हवं होतं. या सुट्टीत कार्यानुभवाचे १०० तास तरी भरायलाच हवेत. चांगल्या कॉलेजासाठी ते तास फारच उपयुक्त आहेत याची प्रत्येकाला जाणीव होती.
घरी आल्यावर अपेक्षाभंगाची नाराजी शुभमच्या चेहर्यावर पसरलेली होतीच. कटकट, चिडचिड चालू होती. त्याच्या चिडण्याची, कुरकुरीची सवय असल्यासारखं कुणी फारसं लक्ष दिलं नव्हतं. रात्री झोपायच्या आधी वाचायला पुस्तक उघडताच आईचं नवीन पत्र हातात आलं. चिडचिड कुठल्या कुठे पळाली.
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
चि. शुभम,
संध्याकाळी वैतागलास आल्याआल्या. तुला मी म्हटलं बसच्या प्रवासाची कटकट होत असेल तर सोडू आम्ही तुला. पण तुझा राग होता तो हॉस्पिटलमधल्या लोकांवर. त्यात मी तुला म्हटलेलं, 'वेलकम टू रिअल लाईफ' ते रुचलं नाही कदाचित.
तुम्ही मुलं हॉस्पिटलमध्ये इतकी मदत करता त्याचं कौतुक तिथल्या कर्मचार्यांना वाटत नाही याचं फार दुःख वाटतंय तुला. पण तिथेच टीनासारखीही माणसं असतात हे विसरू नकोस. यातून एक चांगला निर्णय घेतलास आणि तो कायमचा लक्षात ठेव. तू म्हणालास ना की जर तू डॉक्टर किंवा एखादा मोठा माणूस झालास, तर हाताखालच्या लोकांशी असं वागणार नाहीस, तेच म्हणतेय मी. या कार्यानुभावाच्या निमित्ताने घडलेली आणखी एक चांगली गोष्ट. तू बसने जायला लागलास.
भारतात आम्ही सहज चालत, नाहीतर सायकलीने, बसने कुठेही फिरायचो तुमच्या वयाचे असताना. या देशात ते शक्य नाही. रस्ता माणसांसाठी नसतोच इथे. पुन्हा मोठी शहरं सोडली तर बसची सोय तरी कुठे आहे? त्यातूनही असली तरी किती पालक मुलांना बसने जायला देतात? तू बसने जायचं ठरवलंस तेव्हा थोडीशी धाकधूक होतीच. पण मला माहीत आहे तू खूष होतास, उपदेशाचा एक डोस कमी झाला. नाहीतर आम्ही तुला सोडतो-आणतो सगळीकडे याची तुला किंमत नाही हे कधी ना कधीतरी ऐकावं लागलेलं आहेच. तो भाग सोडला तरी कुठेतरी स्वतंत्र झाल्याची जाणीव पण सुखदायक वाटते. खरं ना? मला तू बसमधले अनुभव सांगतोस ना ते आवडतात ऐकायला.
तुझं निरीक्षण बरोबर आहे. बसमधली, हॉस्पिटलमधली सर्वसामान्य परिस्थितीतली माणसंही समाधानी वाटली ना तुला, त्या डॉक्टर लोकांपेक्षा? फार ताण तणाव नसले की माणसं खुष असतात, हे तुला बघायला मिळतंय हे चांगलंच झालं. तू म्हणालास तसं कधीतरी खरंच आपण सगळे एक चक्कर टाकू बसने. पंधरा वर्षापूर्वी इथे आलो तेव्हा घरात गाडी यायच्या आधी बसने फिरायचो आम्ही. कितीवेळ उभं राहायला लागायचं थांब्यावर. तेव्हा भारतात सहजासहजी मिळणार्या वाहनांचं मोल समजलं. नंतर गाडी आल्यावर बसने जायचा कधी प्रसंगच आला नाही इतक्या वर्षात. पण तुझ्या नजरेतून ऐकायला मिळणारा बस प्रवास आणि बसमधले प्रवासी फारच रंगतदार वाटतायत. तुझ्या वयाच्या मुलांनाही त्यांच्या आई-वडिलांनी हा अनुभव द्यायला हवा असं नाही वाटत तुला? त्यांची शोफरगिरी वाचेल आणि मुलांसाठी एक नवीन अनुभवविश्व. तू सांगायला हवस तुझ्या मैत्रमित्रणींना. कदाचित त्यांनाही वाटेल बसच्या प्रवासाचं आकर्षण आणि मग त्यांच्यामुळे त्यांच्या पालकांना. आता तू खर्या अर्थी स्वतंत्र व्हायला लागला आहेस. गाडी चालवायला शिकणं हे त्यातलं मोठं पाऊल
ता. क. : आज मुद्दाम चि. आणि सौ. शब्द वापरले आहेत. काळाच्या ओघात हे शब्द नष्टच होतील, पत्रलेखनातून. बघ तुला उत्सुकता वाटली तर सांगेन त्याचा अर्थ.

तुझी
सौ. आईता. क. : आज मुद्दाम चि. आणि सौ. शब्द वापरले आहेत. काळाच्या ओघात हे शब्द नष्टच होतील, पत्रलेखनातून. बघ तुला उत्सुकता वाटली तर सांगेन त्याचा अर्थ.
क्रमश:
पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता-व्हिवा- "ओऽऽऽड्यूड" लेखमालिका
मला हा ब्लॉग खूप आवडला..
ReplyDeleteब्लॉग वरील माहिती उत्कृष्ट रित्या मांडली आहे.
माझ्या माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत असलेल्या ब्लॉग ला विझिट द्यायला विसरू नकोस..
http://themarathi-blog.blogspot.in/