१९ तारखेला zoom वर एका अप्रतिम पुस्तकातील काही भाग वाचायची संधी मिळाली तसंच लेखकाशी संवाद साधण्याचीही. 'एक होती माया' पुस्तक माझ्याकडे नसल्यामुळे मी पूर्ण वाचलेलं नाही पण जी प्रकरणं मी कार्यक्रमात वाचली ती अप्रतिम आहेत. ओघवतं वर्णन, किस्से आणि छायाचित्र वाचकाला हमखास मायाच्या प्रेमात पाडतात.
माझ्याकडे मराठी शिकणार्या विद्यार्थ्यांना बोलणं, वाचणं, लिहिणं याव्यतिरिक्त सतत नवं काहीतरी देण्याचा माझा ध्यास असतो. जगातल्या घडामोडी त्यांना मराठीतून समजल्या पाहिजेत, सांगता आल्या पाहिजेत त्याबरोबरच जे वेगळं, अद्भुत असेल ते कळावं यासाठी माझा प्रयत्न चालू असतो. मुलांना जेव्हा सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी आणि अशा अनेक कर्तुत्ववान व्यक्तींबद्दल सांगता येतं, आनंदीबाईंचं अमेरिकेतील स्मारक बघावसं वाटतं तेव्हा माझ्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं.

यावर्षी माझ्या मुलीने कॉलेजच्या एका प्रकल्पासाठी आनंदीबाई जोशींवर निबंध लिहिला आणि त्यानिमित्ताने केलेल्या वाचनानंतर स्वातंत्र्यचळवळीतील स्त्रियांबद्दल तिला किती अभिमान वाटला हे ऐकलं तेव्हा भरुन आलं.
या माझ्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मायाबद्दलची प्रकरणं मी माझ्या विद्यार्थांना वाचून दाखवली. सुखद धक्का बसला तो माझ्या कॅलिफोर्नियाच्या एका विद्यार्थीनीला ताडोबा अभयारण्य, माया ठाऊक होती ह्याचा. इतर विद्यार्थ्यांनाही माया आणि ताडोबाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
तुम्हीही ’माया’ ची जीवनकहाणी आणि किस्से नक्की ऐका, अभिप्राय नोंदवा, कार्यक्रम आवडला तर माझ्या वाहिनीचे सभासद व्हा. (मराठीत - Please, like, comment, and subscribe)
अभिवाचन - प्रसाद घाणेकर, मोहना प्रभुदेसाई जोगळेकर, निलेश कोदे.
झलक:
पूर्ण कार्यक्रम:
Book is available in English as well
No comments:
Post a Comment
तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणार्याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.